विक्तूबाबा यात्रेची माहिती २०२३ Taklaghat 2023
*विक्तूबाबा यात्रेची माहिती २०२३*
Viktubaba Yatrechi Mahiti 2023
Viktuchi Nagri ब्लॉग मध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. हा ब्लॉग सुरु करताना मला खूप आनंद होत आहे. समाधानही आहे कि या माध्यमातून विक्तूबाबा चा प्रचार प्रसार करीत आहे.
या ब्लॉगच्या माध्यमातून मी Viktubaba चा जीवनपट आपण समोर जसाच्या तसा मांडण्याचा प्रयत्न करिन. तसेच Takalghat मध्ये दिवसेंदिवस होणारे बदल आपणा पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करिन.
ब्लॉग वाचताना काही जणांना प्रश्न पडतील, किंवा काही विचारावंस वाटल्यास अवश्य विचारा.
या ब्लॉग शिवाय फेसवुक वर विक्तूची नगरी नावाचा फेसबुक पेज आणि फेसबुक वरच संत विक्तूबाबा तपोभूमी टाकळघाट ग्रुप आहे आणि VIKTUCHI NAGRI नावाने युट्युब चॅनल हि आहे. तुम्ही सर्व भक्तगण त्या फेसबुक ग्रुप आणि पेज ला भेट द्याल आणि विक्तूची नगरी या युट्युब चॅनल ला सबस्क्राईब करून माझी हिम्मत वाढवलं अशी आशा करतो.
नवीन वर्षाची सुरवात झाली कि संत Viktubaba च्या दरबारात वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमाचे वेळापत्रक तयार होते. आणि या वेळापत्रकाची सुरुवात होते चैत्र पौर्णिमेच्या चाळीस दिवसा आधी पासून.
चाळीस दिवसाच्या कालावधीत पहिल्या दिवशी Viktubaba च्या अखंड तुपाच्या फुलवतीचा कार्यक्रम असतो. या वर्षी हा विक्तूबाबाच्या अखंड तुपाच्या फुलवतीचा दिवस रविवार दिनांक २६ फेब्रुवारीला साजरा होणार आहे. Viktubaba पासून चालत आलेल्या प्रथे नुसार हि फुलवात त्यांच्या गुरूच्या म्हणजे संत किसनदास बाबाच्या मंदिरात सतत ४० दिवस तेवत ठेवतात. या चाळीस दिवसाच्या कालावधीला येथील भक्तगण सव्वामहिना Savvamahina देखील म्हणतात.
या सव्वा महिन्याचे महत्व सांगताना बाबा म्हणायचे.
"ज्याला रोज नित्य नियमाने पूजा अर्चना व्रतोपासना करणे जमत नसेल त्याने चैत्र मासात म्हणजेच सव्वा महिन्यात शीलाचे पालन करीत मनोभावे उपासना केल्यास त्याला वर्ष भर आराधना उपासना केल्याचे पुण्य प्राप्त होते. त्याच्या वरील समस्त अनिष्ठांचा नायनाट होऊन त्याचे सर्वतोपरी मंगल होईल. सुख सौभाग्य समृद्धी अशा सर्व सुविधा त्याला प्राप्त होईल"
( या वर्षी २६ फेब्रुवारी ते ०६ एप्रिल २०२३) या सव्वा महिन्या Savvamahina दरम्यान दोन कार्यक्रम येतात एक विक्तूबाबाचा जन्मोत्सव(Viktubaba Birthday) सोहळा जो या वर्षी रविवार दिनांक २६ मार्च ला येत आहे आणि दुसरा म्हणजे होळी पौर्णिमा जी मंगळवार दिनांक ७ मार्च ला येतेय.
आणि मग या चाळीस दिवसाच्या कालावधीचा म्हणजे सव्वा महिन्याचा शेवट होतो चैत्र पौर्णिमेला जी या वर्षी गुरुवार दिनांक ६ एप्रिल २०२३ ला येत आहे.
*विक्तूबाबाच्या दरबारात या वर्षी होणाऱ्या कार्यक्रमाचे वेळापत्रक*
* अखंड तुपाची फुलवत प्रारंभ Akhand Tupachi Fulwat Prarambh
रविवार दिनांक २६/०२/२०२३ पहाटे ०५.०० वाजता प्रारंभ
* संत विक्तूबाबा यांचा जन्मोत्सव सोहळा (महाप्रसाद) Mahaprasad
रविवार दिनांक २६/०३/२०२३
* चैत्र पौर्णिमा यात्रा (वर्षातली सर्वात मोठी) Chaitra Pornima
गुरुवार दिनांक ०६/०४/२०२३
*वैशाख पौर्णिमा (बौद्ध पौर्णिमा)
शुक्रवार दिनांक ०५/०५/२०२३
*संत विक्तूबाबा यांचा स्मृतिदिवस (महाप्रसाद)
सोमवार दिनांक ०८/०५/२०२३
*गुरुपौर्णिमा
सोमवार दिनांक ०३/०७/२०२३
*संत किसनदासबाबा यांचा जन्मोत्सव (महाप्रसाद)
गुरुवार दिनांक ०७/०९/२०२३
*संत विक्तूबाबाच्या आई माता कवडाई यांचा स्मृतिदिवस
शनिवार दिनांक १६/०९/२०२३
* संत विक्तूबाबा प्रतिष्ठान तर्फे विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी भोजनदान
बुधवार दिनांक २५/१०/२०२३
* कार्तिक पौर्णिमा Kartik Pornima
सोमवार दिनांक २७/११/२०२३
संत विक्तूबाबाच्या दरबारात होणाऱ्या वर्षभराचा कार्यक्रम येणे प्रमाणे .
धन्यवाद.....
----------------------------------------xxxxxxxx----------------------------------------------------------------------
या ब्लॉग शिवाय VIKTUCHI NAGRI नावाने युट्युब चॅनेल, विक्तूची नगरी नावाने फेसबुक पेज व संत विक्तूबाबा तपोभूमी टाकळघाट फेसबुक ग्रुप आहे आणि viktuchi_nagri या नावाने इंस्टाग्राम अकाउंट आहे. कृपया भेट देऊन लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.
You tube Channel : VIKTUCHI NAGRI
Instagram :- viktuchi_nagri
Facebook Page Link :- VIKTUCHI NAGRI
Post a Comment