विक्तूबाबा च्या दर्शनाला अनेक संत आले. Viktuchi Nagri viktubaba history
*विक्तूबाबाच्या दर्शनाला अनेक संत आले*
VIKTUBABAच्या कठोर तपसाधनेची चर्चा जनसामान्यापासून तर थोर संतापर्यंत जाऊन पोचली आणि त्यांनी हि बाबांच्या दर्शनाला हजेरी लावली, गोरेगावच्या श्री. संत पुंडलिक महाराज, श्री. कैकाडी महाराज, पारडसिंगा निवासिनी सती अनुसया माता, वर्धा जिल्ह्यातील टाकळखेडा गावचे संत श्री. लहानुजी महाराज या आणि अशाच थोर संत विभुत्यानी बाबांच्या दर्शनाला हजेरी लावली.
याची देही याची डोळा असा कठोर तपसाधना करणारा धुतांगधारी तपस्वी पाहून हे सर्व संतमंडळी थक्क झाले. त्यांनी VIKTUBABAना विनंती केली कि बाबा आता पुरे करा हा अन्न त्याग, आटोपती घ्या हि कठोर तपसाधना असे म्हणून त्या संतांनी बाबांना स्वहस्ते लिंबाचे सरबत पाजून या खडतर अश्या तपसाधनेला विराम दिला.
ज्या वेळी VIKTUBABAनी उपवास त्यागला, त्यावेळेस नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले होते. एवढ्या दीर्घकाळ पर्यंत बाबा केवळ पाणीच पिऊन राहिले. त्यांनतर या सर्व संतांनी बाबांची मुक्त कंठाने स्तुती केली
VIKTUBABAची स्तुती करताना ते म्हणाले सजनांनो या पुण्यभूमीत या महान संतांचा जन्म झाला हे तुम्हा सर्वांचे अहो भाग्य होय. चालून आलेल्या या अमूल्य संधीला असे वाया घालवू नका. यांची सेवा करा, आणि या दुर्लभ अश्या मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्या. या संतांच्या हातापायात बेड्या टाकल्यात, त्यांच्यावर नाना अत्याचार केलेत तरी पण मुखातून ब्र सुद्धा उच्चारला नाही. असा हा सहनशील करुणाकर असा संत आहे. साक्षात भगवंत आहे.
फाटके तुकडे नसतो रे । मन मानेल तेथे बसतो रे ।।
वेड्यापरी हा दिसतो रे । परी ब्रह्मांड गिळूनि बसतो रे ।।
गड्यांनो वेड्याचे पांघरून घेतलेला आणि या जगाने न ओळखलेला
हा महात्मा आहे. तेव्हा पूर्वी केलेल्या चुका पुन्हा करू नका. यांना वेडा म्हणू
नका. असे सांगून त्या सर्वानी बाबांच्या नावाचा जयघोष केला.आणि त्या समया पासून
VIKTUBABA संत असल्याची सर्वांना साक्ष मिळाली.
------------------------------------------------XXXX------------------------------------------------------------
You Tube Channel Link : VIKTUCHI NAGRI
Facebook Page Link : विक्तूची नगरी
Instagram Link : viktuchi_nagri
Telegram Link : VIKTUCHI NAGRI
Post a Comment