आलू पोहा खाओ और विक्तू के गुण गाओ Viktuchi Nagri

 *आलू पोहा खाओ और विक्तूके गुण गाओ*  

Alupoha Khao Aur Viktu ke gun Gao

                                                          भारतात असलेले तीर्थक्षेत्र मग ते मंदिर असो मस्जिद असो, विहार असो किंवा गुरुद्वारा असो अथवा कुण्या संतांचा दरबार असो. अशा ठिकाणी प्रसादाचे प्रचलन हमखास पाहायला  मिळते. त्याव्यतिरिक्त तेथील रिवाजा प्रमाणे एखादा विशिष्ट पदार्थ प्रसाद म्हणून वाटण्याची प्रथा प्रचलित आहे. तो प्रसाद तेथील संतांच्या आवडीचा अथवा परंपरेने चालत आलेल्या रितीरिवाजाप्रमाणे हि असू शकतो. 

VIKTUCHI NAGRI
VIKTUCHI NAGRI


                                                     कुठे मलिंदा, कुठे शिरापुरी कुठे लाडू तर कुठे-कुठे प्रसाद म्हणून चुन-पोळीचे जेवण देण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे बाबांच्या दरबारात अलुपोहा वाटण्याचे प्रचलन आहे. सकाळच्या आरतीत सामील होणाऱ्या प्रत्येक भाविकाला हा आलुपोह्याचा प्रसाद हमखास मिळतो, या पोह्याच्या प्रसादाची प्रथा कशी पडली ते पहा.  


                                                      जेव्हा Viktubaba जंगलात वास्तव्याला होते तेव्हा भक्त मंडळी आपल्या आवडीप्रमाणे बाबांकरिता नानाप्रकारे मिष्टान्न तथा विविध फळे आणत असत. एके समयी बाबांचे पुजारी श्री. किसनदासजी फुलझेले यांनी बाबांना मिष्टान्न, फळे यापैकी काहीही  देता Alupoha बनवून आणला व बाबांना खाऊ घातला. पुजारी किसनदासने दिलेले पोहे बाबांना खूपच आवडले. बाबांनी ते पोहे अगदी मिटक्या मारत खाल्ले.

 

                                                      एवढेच नव्हे तर त्या अलुपोह्याची प्रशंसा केली. मग काय, जो तो भक्त बाबांना विशेष करून आलुपोहाच खाऊ घालू लागले. आणि मग पुढे Viktubabaना सकाळचा अल्पाहार म्हणून पोहेच देऊ लागले आणि बाबांनी सुद्धा Alupoha खाणे पसंत केले या कारणाने तेथे पोह्याचा प्रसाद वाटण्याची प्रथा चालू झाली जी आजही अखंड रूपाने चालू आहे. बाबांच्या त्या आवडत्या प्रसादावर दरबारी गायक कवी बी. संजय यांनी एक सुंदर गीताचीही रचना केली होती. 

                                          " सच्चे दिलसे तुम अपनाओ, 

                                             दुःख दर्द उन्हे बतलाओ, 

                                            अलुपोहा खाओ विक्तू के गुण गाओ "


*आलुपोह्याचा एका भक्ताला विशेष अनुभव*


                                                     हे तर झाले प्रसाद प्रचलनाचे विश्लेषण. आता याच आलुपोह्याच्या प्रसादाचे निमित्त भाविकांना कसे कल्याणप्रद ठरले ते पहा. तसे तर अनेक भक्तांनी या प्रसादाचा अद्भुत अनुभव आल्याचा सांगतात. त्यापैकी एक प्रसंग प्रस्तुत आहे. 


                                                       अकोला जिल्ह्याच्या निवासी भक्ताचा हा प्रसंग,  Viktubabaचा हा उपासक बैलाने चालविता येणारे यंत्र चालवून आपल्या परिवाराचा उदर निर्वाह करायचा. (लोकभाषेत याला तेलघाणी म्हणतात) एके दिवशी तो भक्त बाबांच्या दर्शनाला आला असता viktubaba त्याला म्हणाले, "आगा भल्या माणसा तुया घरी त खा च असली तेल निंगते न, मंग इच्चा पोहा बनवासाठी तू महिन्याचं पाच किलो तेल आणून देसीन का ?" यावर त्या भक्ताने क्षणाचाही विलंब न करता अगदी ख़ुशी ख़ुशी ने होकार दिला. आणि मग तो भक्त नियमित पणे पाच किलो शुद्ध गोडे तेल बाबांना आणून देऊ लागला. आणि त्याच गोडे तेलाने बाबांचा प्रसाद बनत असायचा. 

VIKTUCHI NAGRI
VIKTUCHI NAGRI

                                                      अकोल्याहून Takalghat ला येण्यास तीन जिल्हे पार करावे लागतात. आणि तेवढ्या लांब अंतराहून पाच किलो तेल घेऊन येणे कोणासही परवडण्यासारखे नाही. त्याने तर सरळच म्हंटले असते कि Viktubaba मला तेवढ्या लांबून पाच किलो तेल घेऊन येण्यास परवडत नाही हे पैसे घ्या अन पाच किलो तेल कुठूनही घेऊन या असेच म्हटले असते. त्या भक्ताची स्थिती हि तशीच होती. त्याच्याच परिवाराचे कसेतरी ओढून ताणून पोषण करावे लागत असायचे. परंतु तो भक्त बुद्धिमान होता. 

                                                     बाबांजवळ अनेक धनिक श्रीमंत आले. आणि बाबांना लाखो रुपयाचे दान देण्याचे बोलले परंतु निर्मोही viktubaba नी त्यांच्या कडून एक पैस्याचीही अपेक्षा केली नाही. हे अकोल्याच्या भक्ताने प्रत्यक्ष पहिले होते. मग बाबा मज भिकाऱ्याला पाच किलो तेलाची स्वतःहून  मागणी करत आहे. यात निश्चितच काहीतरी रहस्य दडलेले आहे. हे त्या भक्ताने चटकन ओळखले अन बाबाच्या आदेशाचे पालन करीत तो दर महिन्याला पाच किलो शुद्ध गोडे तेल आणून देऊ लागला. 


                                                      हो बाबांच्या मागणीत खरंच रहस्य दडलेले होते. त्याला तेलाच्या रूपाने बाबांनी त्याची गरिबी मागून घेतली. तो भक्त जस जसा बाबांना तेल आणून देत राहिला तस तसा त्याचा व्यवसाय भरभराटीस येऊ लागला. अन पुढे थोड्याच कालावधीत त्याने बैलाने चालविण्याचे यंत्र बंद करून विजेवर चालणारा तेल काढण्याचा कारखाना सुरु केला. नोकर-चाकर, बंगला, गाडी अशा वैभवाने सजला. अशी हि बाबांची प्रत्येक गोष्ट नवलाईने अगदी ओतप्रोत आहे. 


                                                        बाबा देहाने गेले असले तरी त्यांच्या पोह्याचे रहस्य मात्र आजही जसेच्या तसे कायम आहे. म्हणूनच अनुभवी भक्त मंडळी दरबारात आल्यावर पोह्याचा प्रसाद आवर्जून वाटत असतात आणि सेवनही करीत असतात. 

-------------------------------------------------xxxxx-----------------------------------------------------

विक्तूबाबा बद्दल अधिक माहिती साठी होम पेज वर जाऊन  आमच्या ‘विक्तूची नगरी’ ब्लॉगर ला फॉलो करा.

Youtube Channel Link: VIKTUCHI NAGRI

Instagram Account Link: viktuchi_nagri

Facebook Page Link : VIKTUCHI NAGRI

Blogger Link: VIKTUCHI NAGRI





Powered by Blogger.