भक्तवत्सल विक्तूबाबा Bhaktvatsal Viktubaba
*भक्तवत्सल विक्तूबाबा*
bhaktvatsal viktubaba
Viktubabaकधी-कधी कुण्या भक्तांसोबत कठोरतेने वागत बोलत असत. पण बाबाच्या कठोर वागण्या बोलण्यातही भक्तांचे कल्याणच दडलेले असायचे. viktubabaचा कठोरपणा केवळ देखावा होता. ज्याप्रमाणे नारळ वरून कठीण कवच धारण करून असले तरी त्याच्या आतमध्ये मऊ मऊ व गॉड गॉड खोबरे असते. जसे फणसाला वरून काटे असले तरी त्याच्या आत शरीराला पोषक असा गर असतो. तद्वतच viktubabaजरी मुखाने कठोर बोलत असायचे तरी पण त्यांचे अंतःकरण आइसमान वात्सल्याने आणि करुणेने वाहत होते. या सत्याचा लाखो भक्तांनी स्वानुभव घेतला.
Viktuchi Nagri |
viktubabaभक्तांची मनोकामना पूर्ण करतात. ते करुणा अवतारी अंतर्यामी आणि सिद्धकोटीला पोचलेले संत आहेत, अशी बाबांची कीर्ती ऐकून चंद्रपूरचा एक व्यक्ती भारी मनोकामना घेऊन बाबांच्या दरबारी आला. काय होती त्याची मनोकामना. ? त्याची मनोकामना अशी होती कि मी viktubabaच्या दर्शनाला जाईन, दोनचार दिवस मुक्काम करून मनसोक्त दर्शन घेईन आणि मला हवी असलेली नोकरी मिळवून देण्याची विनंती करिन. आणि हा खरोखरच खरा संत असेल तर माझी मनोकामना पूर्ण करेल.
त्याला जी नोकरी पाहिजे होती, ज्या क्षेत्रात त्याला नोकरी करायची होती त्यासाठी त्याने अनेकदा प्रयन्त करूनही तो अपयशी ठरला होता. आत दरबारात काय झाले ते पहा. तो व्यक्ती viktubabaसमोर येऊन बसताच बाबा त्याच्यावरकी क्रोधायमान झाले. मला त्यांच्या बोलण्याची नकल करता येत नाही पण त्या प्रसंगी बाबा जे वदले ते सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बाबा त्या भक्ताला म्हणाले, "ए कशाला आला रे तू येथे काम धंदे सोडून फुकट खाया, चाल उठ येथून अन लाग रस्त्याला, तुझे येथे काही काम नाही. हेच ते शब्द viktubabaत्या प्रसंगी त्या भक्ताला बोलले.
तो व्यक्ती आधीच वैतागला होता. त्यातच viktubabaनी असे कठोर शब्द बोलले. त्यामुळे त्याचा संताप अनावर झाला. बाबांना अद्वा तद्वा बोलू लागला. अरे हा रे कसला संत अन कसला हा महात्मा म्हणायचा हा तर शुद्ध वेडा आहे वेडा. लोकांना हि कामधंदे नाही आणि मला हि कुठून सुचलं तर मी हि विनाकारण त्रास घेत आलो. असा तो बडबडत गावाला परतला पण गावाला परतताच त्याचा क्रोध पश्चातापात बदलला. अन बाबांना वेडा वेडा म्हणून उपहास करणारा तो व्यक्ती viktubabaच्या नावाचा नामजप करू लागला. त्याच्यात एकाएकी हा बदल कसाकाय झाला?
कारण त्या व्यक्तीला जी नोकरी पाहिजे होती ज्या क्षेत्रात त्याला नोकरी करायची होती नेमके त्याच नोकरीचे त्याला त्वरित बोलवणे आले होते. जर तीन-चार दिवस तेथे जाण्यास उशीर झाला असता तर त्या व्यक्तीचे बोलवणे विचारात घेतले नसते. त्या व्यक्तीला viktubabaचा एक एक शब्द आठवू लागला. बाबांचा कठोरपणा केवळ देखावा असून त्यामागे भक्तांचे केवळ कल्याण आणि कल्याणच दडलेले होते. याची त्याला प्रचिती आली. आणि तेव्हा पासून तो व्यक्ती बाबांचा कट्टर उपासक झाला.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Youtube Channel Link: VIKTUCHI NAGRI
FACEBOOK PAGE LINK : विक्तूची नगरी
INSTAGRAM LINK : viktuchi_nagri
Post a Comment