विक्तूबाबा झाले बेडीवाले बाबा

 *विक्तूबाबा झाले बेडीवाले बाबा*

                                                   Viktubaba Zale Bedivale Baba

                                                  श्री जानबाजी डांगरे यांचा Viktu नावाचा मुलगा वेडापीर आहे पागल आहे, अशी उपेक्षा करणारे, त्यांच्या लीलांना वेडेपणाचा अतिरेक समजून यांचा उपहास करणारे त्यांचे कट्टर उपासक झाल्याचे कित्तेक उदाहरण इथे पाहायला मिळतात. 

                                                 बेडीबंद केलेला हा उपेक्षित संत लाखो लाखो भाविकांचे आराध्य देव झाले. त्यांच्या गळ्यातील ताईत झाले, हे एकाएकीच कसे झाले ? वेड्या विक्तूचा संत Viktubaba Bediwale Baba या नावाने कसे प्रसिद्धीस आले.?

viktuchi nagri
 

                                              तसे तर बाबानी जन्मताच आपल्या आत्मबळाचे भांडार उघडून जन्मजात योगी महात्मा असल्याचे प्रमाण दाखविले आणि त्या नंतर एका पेक्षा एका असे वरचढ नवल बाबांच्या ठायी अखंडपणे घडतच राहिले. तरीपण याला एक योगायोग समजून अनेक लोक बाबांचा उपहासच करीत असायचे. 

                                               त्यांच्या यौगिक बळाला  वेडेपणा उपद्रव समजून त्याला आळा घालण्यासाठी बाबांच्या हातापायात लोखंडी बेड्या घातल्या. मात्र बाबांना बेड्या घातल्या नंतर तर बाबांच्या करणीला अधिकच रंग चढला, त्यांच्या कौतुकाला जणू उधाणच आले, नित्यप्रती नवनवीन व अफलातून कौतुक Viktubabaच्या ठायी घडू लागले.

 

                                              ज्यांनी बाबांना पहिले असेल त्यांना माहित आहे कि बाबांच्या हातापायातील बेड्या कित्ती घट्ट आवळून बांधल्या होत्या, त्या बेड्या मुळे बाबांच्या शरीराची गाठोडीच झाली होती. हि अल्पना तर बाबांच्या छायाचित्रातूनही सहज लक्षात येते. बाबांना हालचालही करता येत नव्हती. तेथे उठून उभे राहण्याची आणि चालण्याची तर गोष्टच दूर राहिली. मात्र ऐकावं ते नवलच या ठिकाणी झाले.

                                              बाबांच्या पायात इतक्या कठोर बेड्या असताना आणि शरीराची हालचालही करणे जमत नसतानाही viktubaba सारे जंगल फिरत असत, नदी नाले पार करत असत. एकाच दिवशी अनेक मैल अंतर पार करत असत. आताच एका स्थळी तर थोड्याच वेळात तिकडे दूर अनेक मैल अंतरावर दुसऱ्या स्थळी पाहून लोक आश्चर्यात पडल्या विना राहत नसत.

viktuchi nagri

                                            viktubaba पावसाळ्यात कृष्णा नदीच्या तटावरील औदुंबर (उंबर ) वृक्षाखाली निवास करायचे. कृष्णेला पूर आल्यावर बाबा त्या पुरात दोन - दोन तीन - तीन दिवस त्या पुरात बुडून राहायचे. पण तरीही बाबांना कसल्याच प्रकारची हानी झाली नाही. 

                                                हे नवलादी नवल घडते तरी कसे ? viktubaba बेडी बंद असताना दूरवर जातात तरी कसे? याचा तपास करण्यासाठी या मागील रहस्य जाणण्यासाठी अनेक लोकांनी बाबांवर पाळत ठेवली पण त्यांना या रहस्याचा शेवटपर्यंत थांग पत्ता लागला नाही.                          
-----------------------------------------------xxx---------------xxx---------------------------------------------------------

या ब्लॉग शिवाय Viktuchi Nagri नावाने युट्युब चॅनेल, संत विक्तूबाबा तपोभूमी टाकळघाट नावाने फेसबुक पेज व फेसबुक ग्रुप आहे आणि Viktubaba_takalghat या नावाने इंस्टाग्राम अकाउंट आहे कृपया भेट देऊन लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.

Youtube :- https://youtube.com/@VIKTUCHINAGRI

Instagram :- viktubaba_takalghat 

Instagram Link :- https://www.instagram.com/invites/contact/?i=80l5da1tduwp&utm_content=ohg8i0b

Facebook Page Link :- https://www.facebook.com/viktuchinagri?mibextid=ZbWKwL




Powered by Blogger.