विक्तूबाबा ची कठोर तपसाधना
*विक्तूबाबा ची कठोर तपसाधना*
आपणापासून लोकांना अतिशय त्रास होतो, लोकांचे नुकसान होते, हि गोष्ट बाबांच्या लक्षात येताच त्याला आळा घालण्यासाठी Viktubabaनी स्वतःभोवती काट्यांचे घनदाट कुंपण करून घेतले, एका पोत्याचे आसन बनविले. अन्नाचा सर्वथा त्याग केला, आणि त्या काटेदार कुंपणाच्या आत बाबांनी स्वतःला बंधिस्त करून घेतले.
Viktubaba ज्या पोत्याचे आसन करून बसले ते पोते बाबांजवळ कुठून आले ? बाबा गृहत्याग करून जंगलात राहायला गेले तेव्हा ते पोते सोबत घेऊन गेले होते काय ? नाही मुळीच नाही. ज्यांना चार बोट चिंधीचाही मोह नव्हता, ते का एवढ्या मोठ्या पोत्याला सोबत घेऊन जाणार ?
ते पोते बाबांनी सोबत नेले नव्हते तर वर्धा जिल्ह्यातील सेलू गावाच्या एका व्यापाऱ्याने Viktubaba ना ते पोते सहर्ष दान केले होते. येथे नवलाची गोष्ट म्हणजे तो एक चतुर व्यापारी असूनही ते पोते दान देण्यापूर्वी दरिद्रीचे जीवन जगत होता. मात्र त्या व्यापाऱ्याने बाबांना ते रिकामे पोते दान दिल्याच्या थोड्याच दिवसात त्याची कायापालट होऊ लागली.
पूर्वी व्यापार करण्यासाठी गावोगावी बैलगाडी घेऊन जाणाऱ्या त्या व्यापाऱ्याला नंतर ती पाळी कधीच आली नाही. पुढे त्याचा मोठ्या स्वरूपाचा व्यापार सुरु झाला. जणू Viktubabaनी पोत्याच्या रूपात त्याची दरिद्री मागून घेतली आणि त्या मोबदल्यात त्याला वैभव प्रदान केले.
बाबांचा असा प्रकार पाहून लोक बाबांची थट्टा करू लागले. अरे वेड्या पिराने आपल्या कृतीला रंग चढविला आहे असे म्हणू लागले, म्हणून Viktubaba चा उपहास करू लागले. परंतु
जया अंगी मोठे पण । त्यासी यातना कठीण ।।
या प्रमाणे Viktubaba आपल्या कृती पासून जराही विचलित झाले नाही.
पंधरा पंधरा दिवस पडणारी पावसाची सतत धार, शरीराला
गोठवून टाकणारी थंडी आणि शरीर होरपळून टाकणाऱ्या कडक उन्हातही बाबा त्याच कुंपणात
तप साधना करीत राहले
-------------------------------------------------------xxx----------------------------------------------------------------
या ब्लॉग शिवाय Viktuchi Nagri नावाने युट्युब चॅनेल, संत विक्तूबाबा तपोभूमी टाकळघाट नावाने फेसबुक पेज व फेसबुक ग्रुप आहे आणि Viktubaba_takalghat या नावाने इंस्टाग्राम अकाउंट आहे कृपया भेट देऊन लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.
Youtube :- https://youtube.com/@VIKTUCHINAGRI
Instagram :- viktubaba_takalghat
Instagram Link :- https://www.instagram.com/invites/contact/?i=80l5da1tduwp&utm_content=ohg8i0b
Facebook Page Link :- https://www.facebook.com/viktuchinagri?mibextid=ZbWKwL
Post a Comment