विक्तूबाबा चा वन्य प्राण्या प्रति मैत्री भाव

 

*विक्तूबाबा चा वन्य प्राण्यासोबत मैत्री भाव*

 

                                                     शरीराला यातना होताच सर्वसाधारण व्यक्ती तर सोडाच पण वेडा सुद्धा निवाऱ्यासाठी धडपडतो, पण Viktubaba नी तर चक्क आधारालाच धुडकावून लावले. इतके महिने होऊनही हा अन्नाविना जगतो तरी कसा ? आणि हा सर्व प्रकार करण्याची या येडपटाला काय गरज येऊन पडली हे नवल जाणण्यासाठी जे जे लोक बाबा कडे येऊ लागले ते ते बाबा समोरील दृश्य पाहून बाबांसमोर नतमस्तक झाले.

viktuchi nagri


                                                    त्यांनी बाबांसमोर कोणते दृश्य पहिले ? त्यांनी Viktubaba च्या अंगा खांद्यावर विषधारी सापांना खेळताना पाहिले. वाघ अस्वल अशा हिंस्त्र प्राण्यांना बाबांचे अंग चाटताना पाहिले. एखाद्या राज्याच्या शिपाया प्रमाणे बाबांसमोर पहारा देत बसलेले पाहिले. बाबांसमोर असे दृश्य पाहून लोक भानावर येऊ लागले.

                                                अरे ज्या क्रीडेची नुसती कृती केली तरी मनुष्याच्या अंगावर भीतीने शहारे उभे होतात आणि येथे तर सारे काही अगदी सहजच घडत आहे. हे चारित्र्य कोण्या वेड्याच्या ठायी नव्हे तर सामर्थ्यशाली योग्याच्याच ठायी घडू शकते म्हणजे आपण ज्याला वेडा वेडा म्हंटल तो तर मोठा महात्मा आहे.

Viktuchi Nagri



                                                आणि त्याच्या लीलांना वेडेपणाच अतिरेक समजून त्यांच्या हातापायात बेड्या टाकल्या आणि हाड हाड म्हणून जंगलात हाकलून दिले हि तर आपली अक्षम्य चूक झाली. हे Viktubaba आम्हा अज्ञानीयांना क्षमा करा असे म्हणून त्यांनी बाबांना क्षमा मागून बाबांची थट्टा करणारे ते सर्व मंडळी बाबांना अनन्य भावाने शरण आले व बाबांचे आजीवन उपासक झाले.


------------------------------------------------xxxxx-------------------------------------------------------------------

या ब्लॉग शिवाय Viktuchi Nagri नावाने युट्युब चॅनेल, संत विक्तूबाबा तपोभूमी टाकळघाट नावाने फेसबुक पेज व फेसबुक ग्रुप आहे आणि Viktubaba_takalghat या नावाने इंस्टाग्राम अकाउंट आहे कृपया भेट देऊन लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.

Youtube :- https://youtube.com/@VIKTUCHINAGRI

Instagram :- viktubaba_takalghat 

Instagram Link :- https://www.instagram.com/invites/contact/?i=80l5da1tduwp&utm_content=ohg8i0b

Facebook Page Link :- https://www.facebook.com/viktuchinagri?mibextid=ZbWKwL

Powered by Blogger.