श्री संत विक्तूबाबा च्या दरबारातील आरती Viktubaba arti

 *श्री संत विक्तूजी बाबा यांच्या दरबारातील आरती*

* Viktubaba aarti*

संत योगी परमहंस अवतरले  । टाकळघाट नाव अजरामर झाले ।

कृष्णा नदी काठी एकांत बसले । सत्कर्मायोगे तप  साधिलें ।

जयदेव जययोगी जय विक्तूबाबा । भक्तीबळे केला भगवंत जागा... ।।धृ।।

..........

स्वतंत्र जीवाला कटिबंध केले । एका पोत्या वरी आसन  मांडिले ।

स्वप्न कवडाईचे पूर्ण झाले। जन्म घेऊनि कुळ उद्धारीले ।

मानवजन्मी या नच घडो पाप । वाढावे जीवनात पुण्याचे माप ।

सुटले टाकळघाट या सदइच्छेनी । आम्रतरू खाली बसले जाउनी..... ।।१।।..जयदेव जय

.......... 

Viktubaba-arti-Takalghat-



डोई जटा लांब दाढी वाढली । हाता  पाया  मध्ये बेडी टाकली ।         

सत्कर्मायोगे  काया झिजविली । अडकविला फास दाव्याचा गळी ।

वस्त्र भूषणे ती फेकून दिली । भूत पिशाच्यात गणती जाहली ।

दिव्य चमत्कार लीला दाविली । पहिली मूर्ती फुले वाहिली...... ।।२।। ..जयदेव जय

 ..........

विदर्भमातेची कुशी फळाली । भक्त भाविकांत  कीर्ती गाजली ।

बेडी आपोआप तुटून पडली । कार्तिक पौर्णिमा तीही गाजली ।

कर्तव्य शक्तीने नाव तरली । महान तपस्वी पदवी मिळाली ।

आप्तेष्टांच्या साऱ्या सोडूनि माया । झाले प्रभू सेवे तल्लीन राया .... ।।३।।..जयदेव जय

.......... 

विहिरीमध्ये स्त्रीला ढकलुनी दिले । जानबाजी पित्याला मारण्या धावीले ।

सात दिन जन्मा पासून न रडले । जन्म विधात्याने नवस फेडिले ।

बंधू भाविकांना शिवी  गाळ केली । भांडी कुंडी घरची फेकून दिली ।

झडकविले रूप वैराग्यालाली । जाउनी बसले दोन्ही हात खाली ।।४।।.....जयदेव जय

.......... 


उन्हाळा हिवाळा जाई पावसाळा । बदलविले नाही कधी मूळ स्थळा ।

पावन होई भक्त बघुनी भोळा । सोमवार दिन दिसे मंगल सोहळा ।

भक्त भाविकांच्या स्वप्नात आला । वर्णिती बहुमंडळ विक्तूची लीला ।

भक्तजनांचा तर उद्धार झाला । कीर्तीचा झेंडा तुज फडकविला ।।५।।..जयदेव जय


Read Also :  https://viktuchinagri.blogspot.com/2023/02/viktubaba-devsthan-takalghat-viktubaba-history-vktuchinagri-viktubaba-arti.html 

SUBCRIBE TO OUR YOUTUBE CHANNEL :   VIKTUCHI NAGRI

ALSO FOLLOW US ON  :        INSTAGRAM 


             

Powered by Blogger.