संत विक्तूजी बाबांचा १०५ वा जन्मोत्सव सोहळा 2023 | Viktuchi Nagri

संत विक्तूजी बाबांचा १०५ वा जन्मोत्सव सोहळा

( दिनांक २६ मार्च २०२३ )



या वर्षी संत विक्तूजीबाबांचा १०५ वा जन्मोत्सव सोहळा अगदी थाटात साजरा करण्यात आला.त्याचा धावता आढावा या ब्लॉगच्या माध्यमातून आपणा समक्ष मांडण्याचा प्रयत्न  करीत आहो.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील विक्तूजी बाबांच्या जन्मोत्सवाची तयारी एक दिवसा आधी पासून झाली. नागपूर शहरातील प्रतिभावंत कलाकारांना बोलवून बाबांच्या समाधीचा गाभारा तसेच संपूर्ण विहार नववधू प्रमाणे सजविण्यात आले. त्याच प्रमाणे टाकळघाट विहार परिसरातील नवयुवक  मंडळाच्या मुलांनी  संपूर्ण विहार परिसर पंचशील तसेच निळ्या रंगाच्या तोरणांनी सजविले.
त्याच दिवशी (25 मार्च ) रात्री बाराच्या सुमारास नवयुवक समता मंडळाची मुलं तसेच इतर भक्त मंडळींनी मिळून संत विक्तूजीबाबांच्या समाधी समोर केक कापून, "विक्तूजी बाबाकी जय हो, बेडीवाले बाबाकी जय हो" अश्या नाम घोषात जन्मदिवस साजरा केला. त्याच प्रमाणे बाहेर रस्त्यावर फटाके फुलझडी लावून आनंद साजरा करण्यात आला.

या सर्व प्रसंगाचा व्हिडीओ "विक्तूची नगरी" युट्युब चॅनल मध्ये प्रदर्शित झाला आहे. तुम्हाला पाहायचा असल्यास त्याची लिंक मी खाली देत आहो. अवश्य पहा.  


दुसऱ्या दिवशी दरवर्षी प्रमाणे नवयुवक समता मंडळाच्या मुलांनी एकमेकांच्या मदतीने संत विक्तूजी बाबांची महारॅली काढली. ठरल्या प्रमाणे रॅलीची सुरुवात विक्तूबाबाच्या ११ वाजताच्या आरती नंतर झाली. रॅली प्रदर्शनात एका गाडीत ( एका बग्गीमध्ये ) विक्तूजी बाबांची भव्य प्रतिमा (फोटो) ठेवण्यात आली. त्या प्रतिमेला संत विक्तूजी बाबांच्या कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार श्री नानाजी शामकुळे यांच्या हस्ते माल्यार्पण  करण्यात आले. त्यावेळी कमिटीतील इतर पदाधिकारीही उपस्थित होते. त्यांनीही बाबांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ हार अर्पण करून वंदन केले.  

या सर्व औपचारिकते नंतर लगेचच रॅलीने तिथून बॅण्डबाजाच्या गजरात "विक्तूजीबाबा कि जय, बेडीवाले बाबा कि जय"  अश्या नामघोषात प्रस्थान केले. रॅली तील ढोल ताश्याच्या आवाजाने आणि भक्तकरवी होणाऱ्या नामघोषाने संपूर्ण विक्तू नगरी अक्षरशः दुमदुमली होती. रॅली मध्ये बुंदीच्या गोड प्रसादही वाटण्यात आला. जो कोणी येई आणि बाबांचा प्रसाद ग्रहण करून जाई.  

अखेरीस दुपारी तीन वाजता ठरल्या प्रमाणे विक्तूजी बाबांचे गुरु श्री संत किसनदास बाबाच्या यांच्या विहारात रॅली थांबवण्यात आली.किसनदास बाबाच्या विहारातील दुपारी तीन वाजताच्या आरती बरोबरच हि रॅली समाप्त झाली असे जाहीर करण्यात आले. 

रॅलीत घडलेल्या एकूण मजेशीर प्रसंगासह त्यांनतर विक्तूजी बाबाच्या विहार परिसरात बाबांच्या १०५ व्या जन्मोत्सव सोहळ्या प्रित्यर्थ लोकांची झालेली गर्दी, त्यादिवशीचा माहोल, त्यादिवशीचे भव्य भोजनदान या सगळ्याचा सविस्तर व्हिडीओ "विक्तूची नगरी" युट्युब चॅनल मध्ये प्रदर्शित झाला आहे.त्याची लिंक खाली देत आहो. अवश्य पहा. 






Powered by Blogger.