विराट शक्ती फुलवातीची Takalghat Viktubaba History
***विराट शक्ती फुलवातीची***
Viktubaba कडे दर दिवशी अनेक भक्त येत व आपले दुःख आपल्या वेदना बाबांना सांगत असत. आणि त्यांच्या त्रासाला नष्ट करण्यासाठी बाबा फुलवात करण्यास सांगत असत. कोणत्याही व्यक्तीला कुठला आजार झाला असेल, दुःखद वेदना होत असतील त्याने एरंडेल तेलाची फुलवात करून शरीरात जिथे कुठे पीडा होत असतील तेथे ठेवल्यास सर्व पीडा शांत होतात.
VIKTUCHI NAGRI |
जर घरचे वातावरण अशांत असेल त्यांनी viktubaba चे नामस्मरण करून हि फुलवात आपल्या घरच्या देव्हाऱ्यात तेवत ठेवल्यास सर्व प्रकारच्या अनिष्टांचा नायनाट होऊन सुख शांती लाभते. याचा आजवर ज्या ज्या भक्तांनी अनुभव घेतला त्यांची कायापालट झाल्याचे आजही ते भक्त अगदी भावविभोर होऊन सांगतात.
एके समयी बल्लारपूरच्या श्री. बाबुराव कुंभारे नावाच्या व्यक्तीच्या पायाला मोठमोठ्या जखमा पडल्या. काही दिवसांनी त्यात किडे हि पडले. या व्याधीचा डॉक्टरांकडून रगड उपचार घेऊनही त्या जखमा बऱ्या झाल्या नाही. सर्वतोपरी करून झाल्यावर शेवटी डॉक्तरांनी सांगितले कि या रोगाने तीव्र रूप धारण केले आहे. तेव्हा तुमचा पाय कापून शरीर वेगळा केल्या शिवाय अन्य उपाय नाही. अन्यथा हीच व्याधी तुमच्या मृत्यूचे कारण बनेल तुमचा बळी घेल्या शिवाय राहणार नाही.
डॉक्तरांचा सल्ला ऐकून बाबुरावला कुडीतून प्राण निघाल्या प्रमाणे वाटू लागले. जर मी अपंग झालो तर माझ्या परिवाराचे हाल बेहाल झाल्या शिवाय राहणार नाही. या दुःखाने हंबरडा फोडू लागला. हि व्याधी कशाने जाईल या विचारात गुंतला असता. त्याचाच एक नातेदार त्यांना भेटायला आला. तो व्यक्ती viktubaba चा उपासकही होता. त्याने यांच्या परिस्थीला जाणून बाबुरावला फुलवात करण्यास सांगितले आणि काय नवल झाले ! बाबांच्या केवळ फुलवतीच्या प्रभावाने बाबूरावच्या पायाच्या जखमा हवेत ठेवलेल्या कापुरा समान कधी उडून गेल्या हे त्याला हि कळले नाही.
याच फुलवतीच्या उपचाराने डोमाजी डांगे या भक्ताची शारीरिक तथा मानसिक व्याधी नष्ट होऊन त्याचा कायकल्प झाला. बाबांची हि फुलवात जशी पूर्वी प्रभावी होती पूर्बी म्हणजे बाबांच्या हयातीत जितकी प्रभावी होती तितकीच प्रभावी ती आजही आहे. जेथे फुलवात प्रज्वलित होते तेथे बाबांचा सदा सर्वदा निवास असतो. त्यामुळे viktubaba चे भक्त या फुलवातीला बाबांच्या शक्तीचे अक्षय अमोघ भंडार म्हणतात. या फुलवातीची प्रशंसा करताना बाबा म्हणायचे.
जरी गेलो मी शरीर सोडून । परी फुलवात माझा जीवप्राण ।
होईल नाना विघ्नांचे शमन । प्रज्वलित करता श्रद्धेने ।।
viktubaba हे वचन आजही शब्द नि शब्द, अक्षर नि अक्षर खरे ठरत आहे. ज्यांना अनिद्रा नावाचा रोग असेल म्हणजे झोप न येण्याचा रोग असेल, ज्यांना मादक वस्तू सेवन केल्या शिवाय झोप येत नसेल त्यांनी viktubaba ची फुलवात करून शरीरावर ठेवल्यास थोड्याच दिवसात हा रोग पूर्णतः बारा होतो असा अनेक भक्तांचा अनुभव आहे अशी हि बाबांची फुलवात अनन्यसाधारण प्रभावी आणि भक्तांसाठी आरोग्य संजीवनी आहे.
ब्लॉग आवडल्यास फॉलो करायला नका.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
VIKTUCHI NAGRI YOUTUBE LINK : http://youtube.com/@VIKTUCHINAGRI
विक्तूची नगरी FACEBOOK PAGE LINK : https://www.facebook.com/viktuchinagri?mibextid=ZbWKwL
viktuchi_nagri instagram Link : https://www.instagram.com/invites/contact/? i=80l5da1tduwp&utm_content=ohg8i0b
VIKTUCHI NAGRI Telegram channel Link : t.me/VIKTUCHINAGRI
Post a Comment