**श्री विक्तूजीबाबांचा जन्म**
*संत विक्तूजी बाबांच्या जन्मापूर्वीचा इतिहास* Viktubaba History
SUBCRIBE TO OUR YOUTUBE CHANNEL : VIKTUCHI NAGRI
ALSO FOLLOW US ON : INSTAGRAM
साऱ्या विश्वभर संतांचे
साम्राज्य पसरले आहें. जगाचे
रहाटगाडगे सुरळीत चालण्यासाठी म्हणून निसर्गाने
संत माहात्म्यांना
नेमून अखिल
विश्वावर अनंत
उपकार केलेत.
भारताच्या भूमीवर तर संतांनी डेराच टाकला
आहे.
(श्री किसनदास बाबा हे श्री विक्तूजी बाबाच्या गुरुस्थानी होते)
संतांच्या इतिहासाचा पडताळा केला तर भारत भूमी हि संतांची कर्मभूमी आहे असे वाटू लागते. आणि त्यातही नवलाची गोष्ट म्हणजे या महाराष्ट्राला संतांची खाण असलेली भूमी, संतांचे माहेरघर असा गौरव प्राप्त झाला आहे.
हा बहुमान कशामुळे प्राप्त झाला ? कारण जगातील कुठल्याही स्थळाच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक संत जन्मले अथवा वास्तव्याला राहिलेत आणि आपल्या पावन स्पर्शाने महाराष्ट्राच्या कणा - कणाला पुनीत केले.
जगातील सर्व तीर्थांचे
पावित्र्य महाराष्ट्राच्या भूमीला लाभले आहे.
आणि अति
पावन म्हणून
गौरव प्राप्त
झालेल्या याच
पारंपरिक संत
भूमीत एकोणिसाव्या
शतकात श्री
किसनदास बाबा
वास्तव्याला होते.
**संत किसनदास बाबांची भविष्यवाणी **Kisandas Baba
सज्जनांनो तुम्ही भाग्याचे धनी आहेत. या गावात Takalghat असा एक योगी करुणा अवतारी, कैवल्यबोधी, महात्मा अवतरित होणार आहे कि त्याच्या सारखा संत इतिहासात पूर्वी कधी झाला नाही. त्या संतांच्या भविष्यवाणी प्रमाणे चैत्र शुद्ध पंचमी सोमवार दिनांक १५ एप्रिल १९१८ साली श्री जानबाजी डांगरे यांच्या कुलदीपकाच्या रूपाने मातोश्री कवडाईच्या पोटी सकळांची कल्याणासाठी Viktubaba अवतरले.
Post a Comment